Home » कॅल्शियमच्या कमतरतेमुळे नाही तर ‘या’ कारणामुळे येतात नखांवर पांढरे डाग…!
Health

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे नाही तर ‘या’ कारणामुळे येतात नखांवर पांढरे डाग…!

मानवी शरीराचे कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी आपले अवयव निरोगी व धडधाकट असणे खूप आवश्यक असते. निरोगी शरीरासाठी शरीरामध्ये विविध प्रकारच्या घटकांची आवश्यकता असते जसे की कॅल्शियम, झिंक, पोटॅशियम, सोडियम इत्यादी. या घटकांची कमतरता शरीरामध्ये निर्माण झाली तर शरीराच्या विविध अंगाद्वारे काही विशिष्ट लक्षणांद्वारे या कमतरतेला दर्शवले जाते.

बहुतांश व्यक्तींना नखांवर पांढरे डाग पडण्याची समस्या निर्माण होते. याला कॅल्शियमची कमतरता कारणीभूत आहे असे अनेकदा समजले जाते मात्र केवळ कॅल्शियमच नव्हे तर झिंक हा सुद्धा घटक आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असतो. झिंकच्या कमतरतेमुळे नखांवर पांढरे डाग पडतात असे आढळून आले आहे.

शरीराला विविध कार्यांसाठी झिंक आवश्यक असते. चयापचयाची क्रिया सुरळीतपणे चालणे, जखमा भरून येणे ही कार्य झिंकद्वारे पार पाडली जातात. झिंकच्या कमतरतेमुळे या सर्वच कार्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. झिंक हे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास सुद्धा सहाय्यकारी ठरते.

जर शरीरामध्ये झिंक कमी पडत असेल तर नखांवर पांढरे डाग दिसून येतात. झिंकची कमतरता घालवण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची औषधे किंवा टॉनिक मिळतात मात्र नैसर्गिकरित्या झिंक मिळवण्यासाठी आपल्या आहारात रेड मीट तसेच मशरूम या पदार्थांचा समावेश करावा.

जसे झिंकच्या कमतरतेमुळे काही परिणाम शरीरावर घडून येतात अगदी त्याचप्रमाणे 40, ग्राम पेक्षा जास्त प्रमाणात झिंक सेवन केले तर आपल्या शरीराला अपाय होतो. जास्त प्रमाणात जिंकणे सेवन केले तर आपल्याला पोट दुखी, उलटी यांसारख्या समस्या निर्माण होतात.