Home » बालविवाह, सासरचा छळ; मजुरी करुन २ रुपयांपासून असं उभारलं पाचशे कोटींचं साम्राज्य…!
Success

बालविवाह, सासरचा छळ; मजुरी करुन २ रुपयांपासून असं उभारलं पाचशे कोटींचं साम्राज्य…!

संपूर्ण जगभरामध्ये समाजव्यवस्थेमध्ये महिला व दलित संघर्ष करताना नेहमीच दिसून येतात. या दोन घटकांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी या दोन्ही घटकांना नेहमीच लढा द्यावा लागला आहे. आज आपण एका अशाच महिला व्यावसायिकाबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करावा लागला मात्र आज ही महिला पाचशे कोटींच्या कंपनीची मालक आहे.

या महिलेचा जन्म दलित कुटुंबामध्ये झाला इथूनच तिच्या संघर्षाला सुरुवात झाली त्यानंतर कुटुंबियांनी बालविवाह करुन दिला. विवाहानंतर सासरच्या लोकांनी दररोज मारहाण करण्यास सुरुवात केली त्या मारहाणीला कंटाळून तिने हे घर सोडले व दोन रुपये रोज अशा रीतीने काम सुरू केले. इतक्या प्रचंड संघर्ष मधून आज पाचशे कोटींची कमाई करण्याची कमाल या महिला व्यावसायिकाने कशी केली हे आज आपण जाणून घेणार आहोत.

ही कहानी आहे कल्पना सरोज या अकोला जिल्ह्यातील रोपरखेड गावात जन्मलेल्या एका महत्वकांशी महिलेची. कल्पना सरोज यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झाला. त्यांचे वडील पोलीस खात्यामध्ये नोकरी करत होते व आपल्या वडिलांच्या तुटपुंज्या पगाराच्या नोकरीवर कल्पना सरोज आपले तीन भाऊ दोन बहिणी व आजी-आजोबांसोबत पोलीस वसाहती मध्ये राहत असत.

त्यांचे शिक्षण हे सरकारी शाळांमध्ये चालू होते मात्र या ठिकाणी दलित कुटुंबामध्ये जन्म झाला म्हणून अनेकदा त्यांना अवहेलनेला  सामोरे जावे लागले. वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी त्यांच्या वडिलांनी जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी कल्पना यांचा बालविवाह केला. या बालविवाहामध्ये त्यांना नेहमीच शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला .त्यांच्या कामांमध्ये चुका काढल्या जात असत. विवाहानंतर अवघ्या सहा महिन्यांमध्ये त्यांचे वडील त्यांना भेटायला गेले व त्यांची अवस्था पाहून त्यांना परत घेऊन आले.

लग्नानंतर माहेरी राहतात म्हणुन कल्पना यांना शेजारी व नातेवाईक टोमणे मारत असत. इतक्या लहान वयामध्ये हे बोलणे सहन न झाल्यामुळे कल्पना यांनी मरण जवळ करण्याचा मार्ग पत्करला. वि’ष घेऊन आ’त्म’ह’त्ये’चा प्रयत्न त्यांनी केला मात्र या त्याच्या प्रयत्नाला यश आले नाही. हा पुनर्जन्म काहीतरी करून दाखवण्यासाठी मिळाला आहे असे त्यांनी मानले. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी आपल्या काकांकडे मुंबईला नोकरीसाठी जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना शिलाई मशिन चालवता येत होते.

कापडाच्या फॅक्टरी त त्यांना धागे निवडण्याचे काम दोन रुपये रोज वर मिळाले. त्यांनी आपला आत्मविश्वास परत मिळवून सव्वा दोनशे रुपये महिना पगारावर शिवणकामाची नोकरी सुरु केली. या काळात त्यांच्या बहिणीला पैशाअभावी उपचार न देता आल्यामुळे तिचा या आजारपणात मृ’त्यू झाला व ही घटना त्यांच्या मनावर आघात करून गेली. या घटनेनंतर कल्पना यांनी मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू गरीबी असून आपल्या आयुष्यात गरीबी पूर्णपणे नाहीशी करण्याचा त्यांनी निश्चय केला.

यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबाला 16 तास‌ काम करून हातभार लावला. त्यांनी महाराष्ट्र सरकारकडून महात्मा जोतिबा फुले योजनेअंतर्गत 50 हजार रुपये कर्ज घेतले. या भांडवलातून एक ब्युटी पार्लर  व फर्निचरचा व्यवसाय  सुरू केला. या  व्यवसायामुळे त्यांच्या आर्थिक प्रगतीला वाव मिळाला. त्यांनी एका व्यावसायिक सोबत विवाह सुद्धा केला मात्र त्यांची साथ अल्प काळ होती. कमानी ट्यूब या बंद पडलेल्या कंपनीला ताब्यात घेण्यासाठी तेथील कर्मचारी कल्पना सरोज यांना भेटले. त्यांनी ही कंपनी पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेतला.

2000 साली यासाठी त्यांनी कायदेशीर लढा सुरू केला. 2006 साली कल्पना सरोज यांना कमानी ट्यूब कंपनीचे मालक बनवण्याचा निर्णय न्यायालयाने दिला. त्यांनी कंपनी वर असलेले कर्ज अवघ्या एका वर्षांमध्ये फेडले. कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा थकित पगार पुन्हा एकदा अवघ्या तीन महिन्यांत दिला. कमानी उद्योग समूह यशस्वी उद्योग म्हणून नावारूपास आणले.सध्या कल्पना सरोज कमानी स्टील्स, केएस क्रिएशंस, कल्पना बिल्डर एंड डेवलपर्स, कल्पना एसोसिएट्स या अन्य कंपन्यांच्या  धुरा सांभाळत आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेत भारत सरकारने 2013 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.