Home » चष्म्यामुळे नाकावर पडलेल्या डागांनी वैतागलात? ‘या’ ५ घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका…!
Fashion Health

चष्म्यामुळे नाकावर पडलेल्या डागांनी वैतागलात? ‘या’ ५ घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका…!

सध्या चष्मा लागण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. सर्वच वयोगटातील व्यक्तींना चष्म्याचा नंबर लागू शकतो. अनेक व्यक्ती चष्म्याचा नंबर असूनही चष्मा लावण्याचे टाळतात. चष्मा वापरल्यामुळे आपल्याला दिसण्याच्या समस्या निश्चितच दूर होतात मात्र वारंवार चष्मा लावल्यामुळे नाकावर काळे रंगाचे डाग किंवा व्रण निर्माण होतात यामुळे आपल्या सौंदर्यात बाधा निर्माण होते.

काही घरगुती उपायांनी चष्म्यामुळे निर्माण होणाऱ्या काळ्या डागांना अगदी सहजपणे दूर केले जाऊ शकते व यासाठी महागडी ट्रीटमेंट घेण्याची ही गरज नाही. असेच काही सहज व सोपे उपाय आज आपण जाणून घेणार आहोत.

  1. कोरफड : कोरफड ही वनस्पती सौंदर्याच्या दृष्टीने जणू एक वरदानच आहे. कोरफडीमुळे आपली त्वचा मुलायम व तजेलदार बनते त्याचप्रमाणे चेहऱ्यावर निर्माण होणारे डाग सुद्धा कोरफडीच्या लेपामुळे नाहीसे होतात. चष्म्यामुळे निर्माण होणारे नाकावरील काळे डाग घालवण्यासाठी कोरफडीचा गर किंवा जेल संबंधित ठिकाणी दररोज लावावा यामुळे थोड्याच दिवसात हे डाग दूर झाल्याचे दिसून येईल.
  2. काकडीचा रस : काकडी ही सौंदर्याच्या दृष्टीने खूपच उपयुक्त मानली जाते. काकडीच्या सेवनामुळे जसे आपल्या शरीराला फायदे मिळतात तसेच काकडीचा रस चेहऱ्यावर लावल्यामुळे सौंदर्यामध्ये वृद्धी होते. नाकावरील काळे डाग घालवण्यासाठी काकडीचा रस दहा मिनिटे डागाच्या ठिकाणी लावून ठेवावा नंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा. हा उपाय नियमितपणे केल्यास निश्चितच फरक जाणवतो. 
  3. लिंबाचा रस : लिंबामध्ये खूप उत्कृष्ट असे ब्लिचिंग चे गुणधर्म असतात. चष्म्याच्या वापरामुळे निर्माण झालेले काळे डाग घालवण्यासाठी लिंबाचा रस दहा मिनिटे चेहऱ्यावर लिंबाची फोड घासून लावावा. थोडा वेळ चेहऱ्यावर हा रस तसाच ठेवून नंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा.
  4. संत्राची साल : संत्र्याची साल सुद्धा खूप औषधी गुणधर्मानी युक्त असते. संत्र्याच्या वाळवलेल्या सालीपासून घरी पावडर बनवता येऊ शकते तसेच बाजारामध्ये सुद्धा ही पावडर अगदी सहजपणे उपलब्ध होते. ही पावडर थोड्याशा दुधामध्ये मिसळून हा लेप चेहऱ्याला लावला असता चष्म्याच्या वापरामुळे निर्माण झालेले डाग दूर होण्यास साहाय्य मिळते.
  5. मध : मध सुद्धा एक नैसर्गिक ब्लीच मानला जातो. मध चेहऱ्यावर लावल्यामुळे व विशेष करून नाकाजवळ चष्म्याच्या निर्माण झालेल्या डागांवर लावल्यामुळे काही दिवसांमध्येच हे डाग दूर झाल्याचे दिसून येते.